
पुणे : अंगारकी चतुर्थीनिमित्त मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (ता. १२) बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.