

Pune Traffic Update: Key Road Closed for 7 Days
esakal
Pune Important Road Closed : सासवड आणि पुणे शहराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेल्या बोपदेव घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. बोपदेव घाट परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती व विस्तारीकरणाच्या कामामुळे हा मार्ग आजपासून बुधवार (ता. १४) पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने घेतला आहे.