Pune : पुण्यात झाड कोसळून आणखी एक मृत्यू, तीन दिवसात दोघांचा बळी

Pune Rain Updates : पुण्यात सोमवारी सायंकाळी झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आणखी एका अशाच घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
Pune rains claim another life as tree collapses
Pune rains claim another life as tree collapsesEsakal
Updated on

पेशवे उद्यानाजवळ गुलमोहराचे झाड कोसळून रिक्षावर पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. दुर्घटनेत रिक्षाचालक जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कर्वेनगर भागात दोन दिवसांपूर्वीच झाड पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. यापूर्वी देखील शहरात झाड कोसळून नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com