पुण्यात झाडं न लावताच वाळली, साडेबारा कोटी खर्च; वृक्षारोपणात घोटाळ्याचा आरोप, वनमंत्री म्हणाले, 'कुणी केलं माहिती घेणार'

Pune Tree Plantation Scam पुण्यात झाडं न लावताच कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे. काही ठिकाणी आधीपासूनच झाडं असताना तिथे नव्याने वृक्षारोपण केल्याचं दाखवण्यात आल्याचाही आरोप केला आहे.
minister Ganesh Naik

minister Ganesh Naik

Esakal

Updated on: 

पुण्यातील वृक्षारोपणाच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. झाडं न लावताच कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे. काही ठिकाणी आधीपासूनच झाडं असताना तिथे नव्याने वृक्षारोपण केल्याचं दाखवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणात वनविभागाचे अधीक्षक जालंधर पाटील यांनीही तक्रार केली होती. मात्र हा प्रकार समोर आणल्यानंतर आपल्याला निलंबित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...