Vijay Chaudhari : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची देशासाठी 'सुवर्ण' कामगिरी

चौधरी यांनी १० गुणांची आघाडी घेऊन सामना ११-०१ ने जिंकून देशाला १२५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून दिले
Vijay Chaudhari
Vijay Chaudhari Sakal

पुणे : विनिपेग (कॅनडा) येथे झालेल्या 'वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम' स्पर्धेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा अपर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांनी कुस्तीमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.

'वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम' या स्पर्धेत विविध देशांतील पोलिस सहभागी झाले होते. शनिवारी (ता. २९) झालेल्या खेळात चौधरी यांचा सामना गतविजेत्या जेसी साहोता यांच्याशी झाला. त्यात चौधरी यांनी ११-०८ अशा फरकाने साहोता यांचा पराभव केला. अंतिम सामना अमेरिकेच्या जे. हेलिंगर यांच्याबरोबर झाला. यामध्ये चौधरी यांनी १० गुणांची आघाडी घेऊन सामना ११-०१ ने जिंकून देशाला १२५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून दिले.

नोव्हेंबर २०२२मध्ये वानवडीमध्ये अखिल भारतीय क्रीडा स्पर्धा झाली. त्यात विजयी होऊन 'वर्ल्ड पोलिस गेम'साठी चौधरी यांची निवड झाली होती. त्यांचा स्पर्धेसाठी तीन ते चार महिन्यांपासून कात्रजमधील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात सराव सुरू होता. प्रशिक्षक हिंद केसरी रोहित पटेल यांच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घेतले.

सुवर्ण कामगिरीबाबत चौधरी म्हणाले, "आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून देशासाठी सुवर्णपदक मिळवू शकलो याचा मोठा आनंद आहे. माझे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरला. कुटुंब, मित्र आणि माझ्या गावाच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com