पुणे : जागरण गोंधळ घालून आंदोलन केल्यामुळे पंचवीस कर्मचारी निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : जागरण गोंधळ घालून आंदोलन केल्यामुळे पंचवीस कर्मचारी निलंबित

पुणे : जागरण गोंधळ घालून आंदोलन केल्यामुळे पंचवीस कर्मचारी निलंबित

sakal_logo
By
रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

पुणे (नारायणगाव) : "पगार कमी , हातात खटारगाडी, रस्त्यावर खडी, तुम्हाला आहे काय सवडी, रस्ता दुरुस्त करून द्या,भीक नाही मागत तुम्हाला आमचा हक्काचा पगार वाढून द्या" या गाण्याच्या माध्यमातून एसटी महामंडळाची बदललेली दिशा व कर्मचाऱ्यांची झालेली दशा कथन करून जागरण गोंधळ घालून नारायणगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी येथील बसस्थानक आवारात अभिनव पद्धतीने आज आंदोलन केले. या आंदोलनाला शेतकरी संघटनेसह तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे.

दरम्यान एसटी महामंडळाच्या आदेशाचे उल्लंघन करून कामावर हजर न राहता, सोशल मीडियाच्या माध्यमातून एसटी महामंडळाची बदनामी केल्या बद्दल नारायणगाव आगारातील चालक, वाहक व यांत्रिकी विभागातील पंचवीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.आशी माहीती आगार प्रमुख बालाजी सूर्यवंशी यांनी दिली.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेने सुरु केलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी नारायणगाव आगारातील २८८ चालक, वाहक सात नोव्हेंबर पासून संपावर गेले आहेत.

हेही वाचा: 'जय भीम' IMDB च्या यादीत सर्वोच्च स्थानी; 9.6 रेटिंग

एसटी महामंडळाच्या सेवेत असलेले कर्मचाऱ्यांचे खडतर काम व वाढलेली महागाई याचा विचार करता चालक, वाहक यांचा पगार अतिशय तुटपुंजा असल्याचे वास्तव समोर आले आहे.दुरवस्था झालेल्या एसटी बस, खड्डेमय रस्ते, वाहतुकीची कोंडी या समस्यांचा सामना करत प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेत नोकरी करत असलेल्या अनेक चालक वाहक यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडले आहे. या मुळे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य असलेली एसटी धोक्यात आली आहे. योग्य पगार मिळण्यासाठी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.

मात्र या मुळे प्रवेशाचे हाल झाले असून खाजगी वाहतूक व्यावसायिकांचे फावले आहे. या बाबत आगर प्रमूख सूर्यवंशी म्हणाले पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव हे महत्वाचे आगार आहे.आगारात ८० बस असून या बसद्वारे रोज ५४६ फेऱ्या होत असतात. कर्मचाऱ्यांनी अचानक संप सुरू केल्याने नारायणगाव आगारचे रोज सुमारे आठ ते नऊ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत विचार करण्यासाठी समिती नेमली आहे.शासन योग्य तो निर्णय घेइल. एसटीच्या व आपल्या हितासाठी कर्मचाऱ्यांनी नोकरीत हजर होणे आवश्यक आहे.

loading image
go to top