

Umaji Naik Memorial in Pune Friday Peth May Finally Move Forward After Two Decades Government Meeting Scheduled for November 18
esakal
पुणे : आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या स्मरणार्थ शुक्रवार पेठेतील ऐतिहासिक जागेवर स्मारक उभारण्याचा वीस वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी १८ नोव्हेंबरला बैठक होणार आहे. आमदार हेमंत रासने यांच्या मागणीनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीचे आदेश दिले आहेत.