
पुणे : शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या चौपदरी भुयारी मार्गाबाबत दिल्लीत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दिली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या प्रकल्पासाठी सर्वंकष विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले.