Pune : सीमेवरील सैनिकांप्रती प्रत्येक भारतीयांच्या मनात आदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune undri diwali festival celebration

Pune : सीमेवरील सैनिकांप्रती प्रत्येक भारतीयांच्या मनात आदर

उंड्री : जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या सीमेवर 24 बाय 7 खडा पहारा देणाऱ्या सैनिकांसाठी भेटकार्ड, पणत्या आणि दिवाळी फराळ भाऊबीजेला देऊन साजरी केली जाणार आहे. सैनिक दिवसरात्र सीमेवर पहारा देत देशाचे रक्षण करीत आहेत, त्यांच्याप्रती आदराची भावना प्रत्येकाच्या मनात आहे, अशी भावना कोल्हापूरचे दृष्टीहीन सतीश नवले यांनी व्यक्त केली.

प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंडचे हनुमान जोशी, रफीक कच्छी, दीपमाला लोहाटे, रेश्मा प्रसाद, प्रवीण काछवा, एमबीएची विद्यार्थिनी वेदही गावंडे या दृष्टीहीन मंडळींना सीमेवरील सैनिकांपर्यंत नेणार आहेत. यानिमित्त हांडेवाडी रस्ता येथील गंगा व्हिलेज सोसायटीमध्ये छोटेखानी शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी चेअरमन योगेंद्र गायकवाड, डॉ. अनिल पाटील, मोहन मोरे, गणेश वाडकर, अंकुश जाधव, रतन कुंडू, वासिम फरास गणेश पाटील, सुनील गव्हाळे, नितेश गंद्रे, रंजना रणपिसे, गीता जमदाडे सोनाली, वर्षा पाटील, समीर शेख, युवराज सावंत, माजी सैनिक रंगाप्पा तलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

दिलावरभाई शेख म्हणाले की, सीमेवरील सैनिक देशाचे रक्षण करतात, त्यांच्याशी दिवाळी भाऊबिजेनिमित्त प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाईंडच्या वतीने संगीत, गायन कार्यक्रमाद्वारे मनोरंजन, सीमेवर पणत्या लावून रोषणाई केली जाणार आहे. तसेच घरापासून दूरवर असणाऱ्या सैनिकांना भेटकार्ड देणे, मिठाई भरवून तोंड गोड करण्याचे काम केले जाणार आहे, ही भारतींसाठी अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.