Pune University : परीक्षाशुल्क वाढीविरोधात एनएसयूआयचे आंदोलन, विद्यापीठाला परिपत्रक रद्द करण्याची मागणी
Student Protest : पुणे विद्यापीठाच्या परीक्षाशुल्कवाढीच्या निर्णयाविरोधात एनएसयूआयच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आंदोलन करत शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षाशुल्क २० टक्क्यांनी वाढविले आहे. परीक्षाशुल्कात केलेल्या वाढीविरोधात नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या वतीने (एनएसयूआय) परीक्षा विभागासमोर आंदोलन करण्यात आले.