
Pune University
sakal
पुणे : उच्च शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवितानाच करिअरबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी महाविद्यालयांची असते. असे असतानाही आता करिअर मार्गदर्शनाच्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमासाठी शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्काचा समावेश विविध गुणदर्शन आणि उपक्रम शुल्कात करण्याची सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना दिली आहे. परिणामी, ‘करिअर कट्टा’च्या नावाखाली शुल्काचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.