
शिवाजीनगर : पुणेकरांची दीर्घ प्रतीक्षा संपली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण बुधवार (ता.२०) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.