आता ऑनलाईन शिकवलेले समजले किती? होणार स्पष्ट; कसं ते वाचा...

ब्रिजमोहन पाटील
मंगळवार, 30 जून 2020

- आॅनलाईन वर्गात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ठेवणार विद्यार्थ्यांवर लक्ष 
- पुणे विद्यापीठ विकसीत करतय 'आॅनलाईन मॅनेजमेंट सिस्टीम'
- आॅगस्टपासून अंमलबजावणी

पुणे : आॅनलाईन शिक्षण देण्यासाठी तयारी शिक्षण संस्थांची तयारी सुरू आहे, पण मुलांना समजले किती?  हा प्रश्न निर्माण होत आहे. हे शिक्षण केवळ एकतर्फी न होता, त्यात मुलांनाही संवाद साधता यावा तसेच त्याला किती समजले आहे हे कळण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे "आॅनलाईन मॅनेजमेंट सिस्टीम" विकासीत केली जात आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना किती समजले यावर लक्ष ठेवले जाणार आहे, हे याचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

'कोरोना'मुळे प्रत्यक्षात महाविद्यालय, विद्यापीठातील विभाग कधी सुरू होतील याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण शिक्षण देताना एकाच वेळी वर्गात सर्व विद्यार्थी उपस्थित राहणार नाहीत. काही जणांना थेट वर्गात तर काहींना आॅनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. पुणे विद्यापीठाने प्रथम वर्ग वगळता इतर वर्षांचे अध्यापन १ आॅगस्टपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. 
-------------
पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे
-------------
खूशखबर ! भारतीय बनावटीची पहिली करोना लस तयार
-------------
आॅनलाईन शिक्षण म्हणले की त्यात शिक्षकांनी रेकाॅर्ड केलेले व्हिडिओ, आॅडिओ किंवा आॅनलाईन लेक्चर एवढाच भाग सध्या येत आहे. ही प्रक्रिया संवादात्मक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवलेले किती समजले? हा प्रश्न मात्र निरुत्तरीत आहे. अनेक विद्यार्थी आॅनलाईन वर्गातून लेफ्ट होतात कधी तर मध्येच सहभागी होतात. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अवघड जात आहे. 

पुणे विद्यापीठाने किमान ४० टक्के अभ्यासक्रम आॅनलाईन करण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून विद्यापीठात काम सुरू केले आहे. विविध विषयांचे प्राध्यापक 'इ केटेंट' निर्मितीच्या कामात आहेत. तसेच "आॅनलाईन मॅनेजमेंट सिस्टीम''  विकसीत करण्यासाठी तज्ज्ञांना यामध्ये सहभागी करून घेतले गेले आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, "कोवीड १९ मुळे शिक्षण पद्धतीत बदल होत आहे. आॅनलाईन शिक्षणाला महत्त्व असले तरी ते सर्वांपर्यंत पोहोंचणे आवश्यक आहे. 'इ कंटेंट'हा संवादात्मक असला पाहिजे. सध्याच्या स्थितीत शिक्षकांनी आॅनलाईन शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना किती समजले कळत नाही. त्यामुळे त्या दृष्टीने पुणे विद्यापीठ साॅफ्टवेअर विकसीत करत आहे. विद्यापीठासह बाहेरील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. 

क्लास रूमचा फिल 
विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण घेताना त्यात त्यांचे मन लागले पाहिजे, त्यासाठी व्हिडिओ तयार करताना त्यात वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलेल्या भागावर प्रश्न विचारणे, प्रश्न सोडवून घेणे त्याची उत्तरे सांगून ते बरोबर आहेत की नाही हे तपासणे याचाही अंतर्भाव त्यात असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण थेट वर्गात आहोत याचा फिल येऊ शकणार आहे. 

विद्यार्थ्यांचा सहभाग कळणार
"आॅनलाईन मॅनेजमेंट सिस्टीम" मध्ये केवळ व्हिडिओ अपलोड केले आणि संपले असे नाही तर विद्यार्थ्यांने ते व्हिडिओ किती वेळ पाहिला, त्याने प्रश्न विचारले का? उत्तर दिले का? यावर देखील लक्ष असणार आहे. त्यामुळे हे शिक्षण घेताना विद्यार्थ्याचा त्यात किती सहभाग होता हे प्राध्यापकांना कळणार आहे. 

"आॅनलाईनचा कंटेट संवादात्मक असला पाहिजे.  विद्यार्थ्यांना किती समजले हे करण्यासाठी त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणता भाग किती समजला हे सुद्धा लक्षात येईल. तसेच ग्रामीण भागात कमी रेंज असली तरी विद्यार्थ्यांना शिकता आले पाहिजे या दृष्टीने आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार करत आहोत."- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University developing New Online Management System