पुणे विद्यापीठ ‘इनोव्हेशन’ मध्ये देशात आठवे

उद्योगांसह सर्वसामान्यांचे रोजचे जीवन सुसह्य करणाऱ्या नवकल्पना आणि नवोपक्रम हाती घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात आठवा क्रमांक पटकावला आहे.
Pune University
Pune UniversitySakal
Summary

उद्योगांसह सर्वसामान्यांचे रोजचे जीवन सुसह्य करणाऱ्या नवकल्पना आणि नवोपक्रम हाती घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात आठवा क्रमांक पटकावला आहे.

पुणे - उद्योगांसह सर्वसामान्यांचे रोजचे जीवन सुसह्य करणाऱ्या नवकल्पना आणि नवोपक्रम हाती घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Pune University) देशात आठवा क्रमांक (Rank) पटकावला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘अटल’ या नवोपक्रम राष्ट्रीय क्रमवारी (अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्युशन्स ऑन इनोव्हेशन आचिव्हमेंट) (Innovation) नुकतीच घोषित केली असून, त्यात विद्यापीठ देशात आठव्या तर राज्यात पहिल्या स्थानावर आहे.

देशातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये ‘नवोपक्रम व उद्योजकता विकास’ होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील 'ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन' तर्फे शिक्षणसंस्थांची नवोपक्रमातील उद्दीष्टपूर्ती या विषयक राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाते. २०२१ या वर्षात देशातील एक हजार ४३८ शिक्षणसंस्थानी या क्रमवारीत सहभाग घेतला होता. त्यामध्ये आयआयटी, एनआयटी आयआयएससी आदी संस्थांचाही समावेश आहे. यामध्ये देशातील अभिमत व राज्य विद्यापीठांच्या पहिल्या दहा विद्यापीठाच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी बुधवारी ही क्रमवारी जाहीर केली.

Pune University
फातिमानगर येथील आशा शिंदे आजींनी जपलाय ५५ वर्षापासून डायरी लिहिण्याचा छंद

याबाबत माहिती देताना नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, ‘स्टार्टअप, नवोपक्रम, कृत्रिम बुद्दीमत्ता आदी विषयांशी संबंधित अनेक कार्यक्रम आपण वर्षभरात घेतले. मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ अनेक उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी जोडले गेले आहे. सध्या विद्यापीठात ४० स्टार्टअप सुरू आहेत तर ३४० संलग्न महाविद्यालयात इनोव्हेशन सेल स्थापन केले आहे.’’

विद्यापीठाने कॅम्पसवर व संलग्न महाविद्यालयात नवोपक्रम, स्टार्टअप संस्कृती रुजवण्यासाठीच ‘इनोव्हेशन सेल’ची स्थापना विद्यापीठात केली आहे. शिक्षण, उद्योग आणि सामाजिक प्रश्न यांच्या एकत्रीकरणातून नवोपक्रम आणि नवसंशोधन व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अटल क्रमवारीत मिळालेलं हे स्थान विद्यापीठाने केलेल्या कामाची पावती आहे.

- प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com