
Pune University Exam
Sakal
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील हिवाळी सत्र परीक्षेसाठी आठवा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांना मंगळवारपर्यंत (ता. १४) परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. अतिवर्षण आणि सद्यःस्थिती लक्षात घेऊन विलंब आणि अतिविलंब शुल्क आकारण्यात येणार नाही, असेही विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्पष्ट केले आहे.