पुणे विद्यापीठाच्या फर्स्ट सेमेस्टर उद्यापासून; सुरळीत परीक्षेचे आव्हान 

Pune University First semester exam will start from pune
Pune University First semester exam will start from pune

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रथम सत्र परिक्षा शनिवारपासून (ता. १०) सुरू होत असून पहिल्या दिवशी 80 विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठापुढे परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आव्हान असताना, विद्यार्थ्यांनी तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास घाबरून न जाता विद्यापीठाशी संपर्क साधावा. परीक्षा देताना इंटरनेट नसल्याने उत्तर सेव्ह होणार नसल्याने नेट कनेक्टिव्हिटी तपासावी असे आवाहन केले आहे.  गेल्या महिन्याभरापासून विद्यापीठाने प्रथम सत्र परीक्षेची तयारी सुरू केली आहे. यामध्ये जवळपास ४ हजार ८०० विषयांची परीक्षा घेतली जाणार असून, सुमारे सहा लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मोबाईल, लॅपटॉप, टॅब अशा वैय्यक्तिक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना घर बसल्या आॅनलाईन परीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल च्वाइल  क्वेश्चन-एमसीक्यू) पद्धतीने होणार आहे. एका तासाच्या परीक्षेत ६० पैकी ५० प्रश्न सोडवणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. 

सराव परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तर सेव्ह व होणे, लाॅगईन आयडी व पासवर्ड न मिळणे अशा अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. असा गोंधळ आता पुन्हा होऊ नये म्हणून विद्यापीठाने कंबर कसली आहे. 

पुण्यात नागरिकांच्या विरोधामुळे एक कोविड सेंटर बंद

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर म्हणाले, परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे आहेत. विद्यार्थ्यांनी आॅनलाईन परीक्षेस सुरूवात केल्यानंतरलकमीत कमी २० मिनीटे पेपर सोडवावा, सोडविलेले सर्व प्रश्न सेव्ह होतील. तसेच मोबाईल, लॅपटॉपचे इंटरनेट डिस्कनेक्ट होणार नाही याची काळजी घ्या. इंटरनेट नसेल तर उत्तर सेव्ह होणार नाहीत. त्यामुळे पेपर  सबमिट करताना उत्तरे देऊनही ती सबमीट झाले नाहीत असे दिसू शकते. परीक्षा देताना अचानक बंद पडली तर विद्यार्थ्यांना तेवढाच वेळ पुढे वाढवून दिला जाईल. 


हेल्पलाईनसाठी ५० जण 
विद्यार्थ्यांना परीक्षे दरम्यान येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी चाट बाॅक्स आणि फोन नंबर अशी हेल्पलाईन उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ५० जणांची टीम असणार आहे. एकाच दिवसी हजारो विद्यार्थी परीक्षा देणार असल्याने फोनवरचा वेटिंग टाईम ३ मिनिटांचा असू शकणार आहे, असे अधिकार्यांनी सांगितले. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज ८० विषयांची परीक्षा
परीक्षेच्या पहिल्या दिवशी ८० विषयांची परीक्षा होणार असून, यात सुमारे २८ हजार विद्यार्थी परीक्षा देतील. यात बहुसंख्य बॅकलाॅगचे विद्यार्थी असणार आहेत. १६ ते २३ एप्रिल या दरम्यान रोज किमान दीड लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 

विमानाने आणलेले कामगार रेल्वेने पुन्हा त्यांच्या गावी

एसपीपीयू एज्युकेशन फाऊंडेशनची परीक्षा
या परीक्षेचे काम पुणे विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशन या कंपनीला दिले असून, सुमारे ६ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आव्हान आहे. परीक्षेच्या कामासाठी फाऊंडेशनने दुसरी एक कंपनी नियुक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com