Big breaking : पुणे विद्यापीठाच्या निकालाची प्रतिक्षा संपली?

ब्रिजमोहन पाटील
Friday, 29 May 2020

राज्य शासनाने पदवी व पदव्युत्तरचे अंतीम वर्ष सोडून इतर वर्षाच्या परीक्षा रद्द केल्याने, त्यांचे अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल लावण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यास आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

पुणे : राज्य शासनाने पदवी व पदव्युत्तरचे अंतीम वर्ष सोडून इतर वर्षाच्या परीक्षा रद्द केल्याने, त्यांचे अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल लावण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यास आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) व कुलगुरूंच्या समितीच्या शिफारशीनुसार विद्यापीठाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा होणार तर, इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना गतवर्षीच्या व यंदाच्या गुणांवरून अंतर्गत मूल्यमापन करून पुढील वर्षात प्रवेश घेण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार  पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेने त्या संदर्भातील प्रस्ताव मान्य करून परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे पाठविण्यात आला. 

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी परीक्षा मंडळाची बैठक झाली. त्यात शासनाच्या धोरणावर चर्चा करण्यात आली. अंतीम वर्ष सोडून इतर वर्षांच्या निकालासाठी महाविद्यालय स्तरावर प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील सुमारे ५ लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मार्च महिन्यात पुणे विद्यापीठाने पदवीच्या परीक्षा सुरू केल्या होत्या. त्यात प्रथम व द्वितीय वर्षांचे काही विषयांच्या परीक्षा झालेल्या आहेत. तर काही विषय शिल्लक आहेत. ज्या विषयांच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्यांचे  कॅप सेंटरमध्ये जमा असून, अद्याप पेपर तपासणी झालेली नाही. त्यामुळे हे पेपर महाविद्यालयात परत पाठवून प्राध्यापकांकडून तपासून घ्यावे लागणार आहेत. तसेच रेड झोनमध्ये ही काय करायचे यावर चर्चा झाली. पुढील एक दोन दिवसात निकाल लावण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे सुत्रांनी सांगितले

अंतीम वर्षासाठी शासनाच्या आदेशाकडे लक्ष पुणे विद्यापीठाने अंतीम वर्षाच्या दीड तासाचा व ५० गुणांची परीक्षा घेण्याबाबत विद्या परिषदेत निर्णय घेतला आहे. मात्र, अंतीम वर्षाच्या परीक्षेबाबत राज्य सरकार काय निर्णय देईल याकडे विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष आहे. आता सध्या लागू असलेल्या आदेशानुसार परीक्षेचे फक्त नियोजन करून ठेवले जात आहे, असेही सुत्रांनी सांगितले.

हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune University results will be available soon