नियतीचा क्रूर डाव! वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

नाशिकरोडच्या बिटको परिसरात हदय पिळवटून टाकणारी घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्याचा पंचविसावा वाढदिवस आनंदात पार पडाला...वाढदिवस साजरा झाल्यानंतर घरच्यांसाठी मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी तो गेला असता, माघारी येत असतानाच काळाचा असा घाला की...

नाशिक : नाशिकरोडच्या बिटको परिसरात हदय पिळवटून टाकणारी घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्याचा पंचविसावा वाढदिवस आनंदात पार पडाला...वाढदिवस साजरा झाल्यानंतर घरच्यांसाठी मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी तो गेला असता, माघारी येत असतानाच काळाचा असा घाला की...

अशी आहे घटना

वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने घरातील थोरामोठ्यांचे आशिर्वाद घेतले, जेवण झाले आणि रात्री अकरा वाजता घरापासून थोड्याच अंतरावर दुचाकीच्या अपघातात त्याची प्राणज्योत मालवली. नाशिकरोडच्या बिटको परिसरात ही हदय पिळवटून टाकणारी घटना घडली. बुधवारी (ता. २७) रात्री अकरा वाजता बिटको चौकालगत ठाकूर ज्वेलर्स समोरुन शिवराज विक्रम कावळे (२५, रा. रजनी बंगला, हॉटेल विश्वंभरच्या मागे, दत्त मंदीर) हा रात्री अकरा वाजता त्याची ऍक्टिव्हा गाडी (एमएच १५ जी.डी.२२८९) वरुन घरी जात असताना एका बुलेटचालकाने त्यास धडक दिली. या अपघातात शिवराजच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागला. अपघाताचा आवाज ऐकून शिवराजचा मित्र मुनाफ दाऊद शेख हा धावत घटनास्थळी गेला. मात्र, बुलेट चालक तेथून फरार झाला. 

मित्र आला धावून पण...

शेख याने इतरांच्या सहाय्याने तत्काळ जयराम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु, गुरुवारी (ता.२८) दुपारी उपचार सुरू असताना एक वाजता शिवराजची प्राणज्योत मालवली. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण, काका-काकू, चुलत भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

हेही वाचा > हुश्श...'त्या' आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह!

आनंदावर विरजन

स्वभावाने मनमिळावू असलेल्या शिवराजचा वाढदिवस घरातच साधेपणाने साजरा केला. संपूर्ण कुटुंब आनंदात होते. यावेळी कॉलनीतील सर्व ज्येष्ठांचे शिवराज याने आशीर्वादही घेतले. वाढदिवस साजरा झाल्यानंतर घरच्यांसाठी मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी शिवराज दुचाकीवरून गेला होता. माघारी येत असतानाच त्याचा अपघात झाला.

हेही वाचा > कधी संपणार 'या' वाड्यांची शोकांतिका?...अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The unfortunate death of a youth in an accident on his birthday nashik marathi news