
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आयोजित केलेल्या ‘व्हॉइस ऑफ देवेंद्र’ या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करणारे परिपत्रक काढले. परंतु, ज्ञानमंदिर असणाऱ्या विद्यापीठाने असे आवाहन करत उघडपणे राजकीय व्यक्तिपूजेचा प्रकार केल्याचा आरोप करत ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया पुणे’च्या (एनएसयूआय) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विद्यापीठात तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल घेत अखेर विद्यापीठ प्रशासनाने हे परिपत्रक मागे घेतले.