Pune Traffic News : विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

औंधकडून येणारी वाहतूक विद्यापीठातून वळविणार; पर्यायी मार्गावर वाहतूक वळविण्याची पालकमंत्र्यांची सूचना
pune university traffic diversion metro work pune aund road alternative route
pune university traffic diversion metro work pune aund road alternative route sakal

पुणे : गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे आनंद ऋषीजी महाराज चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

या चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी औंधकडून येणारी वाहतूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वळवण्यास विद्यापीठ प्रशासनाने पालकमंत्री पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.

या बैठकीत पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भात उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत विद्यापीठाच्या आतून विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार ते वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेपर्यंत नवा रस्ता तयार करण्याबाबत प्रस्ताव समोर आला होता. या प्रस्तावाला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणानेही (पुम्टा) मान्यता दिली होती.

या कामाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासनाच्या मान्यतेची आवश्यकता होती. त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घेतला. यासाठी पाटील यांनी विद्यापीठ प्रशासन, महापालिका आणि वाहतूक पोलिस विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.

तसेच, उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्गावर वाहतूक वळविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याला विद्यापीठ प्रशासनानेही अनुकूलता दाखवली आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

बैठकीला पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे, पुणे विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता विजय ढवळे, विद्यापीठ विकास मंच समन्वयक राजेश पांडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com