
पुणे : गणेश खिंड रस्ता आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची तत्काळ दखल घेत वाहतूक शाखेने विद्यापीठ परिसरातील कोंडी टाळण्यासाठी गुरुवारी सकाळपासूनच काही वाहतूक पोलिसांची नेमणूक केली. दरम्यान, या भागात आणखी वॉर्डन उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.