esakal | पुणे: बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना तीन लाखांपर्यंतची कामे
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

पुणे: बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना तीन लाखांपर्यंतची कामे

sakal_logo
By
अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा

पुणे: महापालिकेकडून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडे प्रत्येकी दोन लाखांप्रमाणे विविध प्रकारची पाच कामे बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना वाटपासाठी प्राप्त झाली आहेत. त्यासाठी बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांकडून परिपूर्ण प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

हेही वाचा: कोल्हापूर: कळंबा परिसरात चाकू हल्ला; तिघे जण जखमी

बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना तीन लाखांपर्यंतची कामे विनानिविदा देण्याबाबत सरकारी आदेश आहेत. त्यानुसार सेवा सोसायट्यांनी पुणे जिल्ह्यातील कार्यरत आणि सरकारी कामे मिळण्यासाठी सर्व अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

तसेच, या कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या बेरोजगारांच्या सेवा सहकारी सोसायट्यांनी रास्ता पेठेतील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ पुणे-११ या कार्यालयास २३ सप्टेंबरपूर्वी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

loading image
go to top