वाढत्या शहरीकरणावर शुक्रवारी परिसंवाद

वाढत्या शहरीकरणावर
शुक्रवारी परिसंवाद
Published on

पुणे, ता. ८ ः पुणे शहरातील वाढते शहरीकरण, उंच इमारतींची बांधकामे आणि वाढत्या बांधकाम परवानग्यांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, पायाभूत सुविधा, उद्याने, क्रीडांगणे, पाणीपुरवठा आणि रस्त्यांवरील ताण यावर चर्चा करण्यासाठी राजीव गांधी स्मारक समितीतर्फे शुक्रवारी (ता. ११) परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या वेळेत नवी पेठेतील पत्रकार भवन येथे हा परिसंवाद होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्याचा विकास नगररचना विभागाच्या निर्देशांनुसार तसेच टीपी, डीपी, यूडीसीपीआर आणि एचसीएमटीआरच्या नियमानुसार होत आहे का, याचा आढावा परिसंवादात घेतला जाणार आहे. वाढत्या बांधकामांमुळे शहराच्या अंतर्गत वाहतुकीवर होणारा परिणाम, लोकसंख्येची घनता, पर्यावरण आणि नागरी सुविधांवरील ताण यावरही विचारमंथन होईल.

क्रेडाईच्या अहवालानुसार शहरात ९३ हजारांहून अधिक घरे विक्रीअभावी पडून असल्याचे नमूद करण्यात आले आहे, तसेच शहरात सुमारे सहा हजार कोटी चौरस फुटांची नवीन बांधकामे होणार असल्याचे वास्तुविशारद मकरंद शेंडे यांनी सांगितले. परिसंवादात माजी खासदार वंदना चव्हाण, माजी महापालिका आयुक्त महेश झगडे, पर्यावरण तज्ज्ञ सारंग यादवाडकर, प्रा. प्रताप रावळ, प्राजक्ता दिवेकर, शिरीष केंभावी, सुहास पटवर्धन आदी सहभागी होणार आहेत.

या वेळी प्रताप रावळ, भोला वांजळे, आबा जगताप, संजय अभंग, नंदकुमार पापळ, अनिल धिमधिमे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com