Pune news : टुरिस्ट व्हिसावर आले अन्... पुण्यात ३ अमेरिकन नागरिकांचा धक्कादायक कारनामा, पोलिसांनी दिले देश सोडण्याचे आदेश

Religious Conversion Case : स्थानिक चालकाने हा प्रकार लक्षात घेऊन पोलिसांना माहिती दिली. खडक पोलिस ठाण्यात या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तिन्ही नागरिकांना १० मेपर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले.
Pune news : टुरिस्ट व्हिसावर आले अन्... पुण्यात ३ अमेरिकन नागरिकांचा धक्कादायक कारनामा, पोलिसांनी दिले देश सोडण्याचे आदेश
Updated on

नाशिकमधील धर्मांतरणाचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात अमेरिकन नागरिकांचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे. टुरिस्ट व्हिसावर आलेल्या तीन अमेरिकन नागरिकांना धार्मिक प्रचार केल्याने पुणे पोलिसांनी त्यांना देश सोडण्याचे आदेश दिल आहेत. हे तिघे पुण्यातील शुक्रवार पेठ भागात धर्मांतराचा प्रयत्न करत असल्याचे आले समोर आले होते. त्यांच्यावर खडक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही १० मे पर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com