esakal | पुणे: शहरात आजपासून ७५ तास लसीकरण । Vaccination
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

पुणे: शहरात आजपासून ७५ तास लसीकरण

sakal_logo
By
ब्रीजमोहन पाटील

पुणे : देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पुणे महापालिकेतर्फे उद्यापासून (मंगळवार) शहरात सलग ७५ तास कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि कोथरूड येथील सुतार दवाखाना या दोन केंद्रांवर कोव्हीशील्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

हेही वाचा: पुणे: सहकार चळवळ एकत्रितरीत्या वाढवूया

देशभरात यंदा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. यात विविध उपक्रम राबवले जात असताना लसीकरण मोहिमेला व्यापकता देण्याचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे शहरात सलग ७५ तास लसीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात गेल्या ९ महिन्यामध्ये ३० लाख नागरिकांचा पहिला डोस तर १५ लाख नागरिकांचे दोन्ही डोस झालेले आहेत. अजूनही साडेतीन लाख जणांचा पहिला तर १८ लाख नागरिकांचा दुसरा डोस राहिलेला आहे. लसीकरण गतीने करून हे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

हेही वाचा: पुणे: शहरातील भाजी मार्केट आता दिवसभर सुरु राहणार

आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती म्हणाले, ‘‘कमला नेहरू आणि सुतार दवाखान्यात ७५ तास लसीकरण केले जाणार आहे. यासाठी दोन्ही केंद्रावर प्रत्येकी डॉक्टरांसह १५ कर्मचारी. तीन पाळ्यांमध्ये लसीकरण सुरू राहील. प्रत्येक पाळीसाठी ५ जण असणार आहेत. या ठिकाणी कोव्हीशील्ड लसीचा व सिरिंजचा योग्यप्रमाणात पुरवठा केला आहे.

आठ ऐवजी दोनच केंद्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका केंद्रावर ७५ तास लसीकरण मोहीम राबविली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने ८ केंद्र सुरू करणे अपेक्षीत होते, पण दोन केंद्रावर ७५ तास लसीकरण केले जाणार आहे.

loading image
go to top