esakal | बेळगाव: शहरातील भाजी मार्केट आता दिवसभर सुरु राहणार । APMC
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव : शहरातील भाजी मार्केट आता दिवसभर सुरु राहणार

बेळगाव : शहरातील भाजी मार्केट आता दिवसभर सुरु राहणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सदाशिवनगर: कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) भाजी मार्केट दिवसभर भरण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांना ताजा माल मिळत आहे. रोज मालही एपीएमसीत येत असल्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, अधिकाधिक शेतकऱ्यांना याची माहिती मिळण्यासाठी एपीएमसीने जागृती करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा: आचरा-मालवण रस्त्यावर भीषण अपघात, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापूर्वी भाजी मार्केटच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. यामुळे सकाळी ५ ते सकाळी १० या वेळेत भाजी मार्केट सुरु केले जात होते. मात्र, या वेळेचा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका बसत होता. यामुळे यात बदल करण्यात आला असून यानंतर प्रत्येक सोमवारी सकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत भाजी मार्केट सुरु राहत आहे. तसेच मंगळवारी दुपारी १ ते सायंकाळी ७ पर्यंत तसेच बुधवारपासून रविवारपर्यंत सकाळी ६ ते सकाळी १० व दुपारी १ ते ७ पर्यंत मार्केट सुरु राहत आहे. सोमवारी (ता. ४) फक्त सकाळच्या टप्प्यात मार्केट सुरु होते.

हेही वाचा: खडकवासला: सालाबादप्रमाणे यंदाही खडकवासल्यात 'गोधडी महोत्सव'

एपीएमसीत सकाळच्या टप्प्यात मोठी गर्दी होत असून दुपारच्या टप्प्यात प्रतिसाद थोडा कमी आहे. दुपारनंतर पालेभाज्यांची आवक अधिक होत आहे. एपीएमसीचे मार्केट दिवसभर सुरु ठेवल्याचा लाभ गोवा येथील व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यांना ताजा भाजीपाला मिळत आहे. यापूर्वी भाजीपाला मार्केट दिवसभर भरत होते. मात्र, कोरोनानामुळे मार्केटची वेळ कमी करण्यात आली होती.

मात्र, याचा फटका व्यापारी व शेतकऱ्यांनाही बसत होता. याचा विचार करून मार्केटची वेळ बदलण्यात आली असून ते सोयीचे ठरत आहे. बेळगावातून कर्नाटकातील विविध जिल्ह्यासह, गोवा, महाराष्ट्र आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला जातो. दिवसभर मार्केट सुरु राहत असल्याने बाहेरच्या व्यापाऱ्यांनाही सोयीस्कर झाले आहे.

"व्यापारी व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी भाजी मार्केटची वेळ बदलण्यात आली आहे. आता दिवसभर भाजी मार्केट सुरु असल्याने व्यापारी व शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ताजा माल मिळत असून दरही चांगला मिळत आहे."- निंगाप्पा जाधव, सदस्य, एपीएमसी

loading image
go to top