Vanaz Metro Subway Issues : रस्ता ओलांडायचा तर भुयारी मार्गातूनच; पण अनधिकृत पार्किंगमुळे पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीला

Impact of illegal parking near Vanaz Metro subway: वनाज मेट्रो स्थानकाजवळ असलेल्या भुयारी मार्गात पाइपलाइनच्या कामामुळे धूळ, नामफलकाशेजारी कचरा आणि अनधिकृत पार्किंगमुळे पादचाऱ्यांना अडथळा होत असला तरी, वाहतूक कोंडीमुळे रस्ता ओलांडण्यासाठी हा मार्ग चांगला पर्याय असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
Vanaz Metro congestion

Vanaz Metro congestion

Sakal

Updated on

पुणे : शहरातील मोठे रस्ते, चौक सुरक्षितपणे पादचाऱ्यांनी ओलांडावेत, म्हणून महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पादचारी भुयारी मार्ग बांधले. पण या भुयारी पादचारी मार्गांची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित केली जात नाही. भुयारी मार्गात पडलेला कचरा, अपुऱ्या प्रकाशामुळे अंधार, तेथे असणारे तळीरामांचे अड्डे यामुळे सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

काही भुयारी मार्ग तर वर्षानुवर्षे बंद असून, त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे पुणे महापालिका प्रशासन कधी लक्ष देणार? असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत. पुणे शहरासह उपनगरांतील भुयारी पादचारी मार्गांची ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी पाहणी केली. यातून भयाण वास्तव समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com