

Vetal Hill Excavation Pune PMC Faces Questions Over Blank Notice Issued To Landowner After Illegal Digging Complaint
esakal
पुणे : वेताळ टेकडीचे जेसीबीने खोदकाम करून लचके तोडण्याचा प्रकार समोर आला, त्यास नागरिकांनी कडाडून विरोध केल्यानंतर महापालिकेने येथील काम थांबविले आहे. मात्र, संबंधित जागामालकाला नोटीस बजावण्यात आली. पण कोऱ्या कागदावर नोटीस बजावण्यात आली असून, त्यावर महापालिकेचे बोधचिन्ह, कनिष्ठ अभियंत्याची केवळ स्वाक्षरी आहे, तसेच त्यावर जावक, आवक क्रमांकाची नोंद नसल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणाही समोर आला आहे.