

pune car accident
esakal
Pune Latest News: वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील भैरोबा नाल्यावरील पुलावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चारचाकी गाडी अनियंत्रित होऊन थेट नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला होता. मात्र, प्रसंगावधान राखत लष्करी अधिकारी नायर आशिष कुमार यादव यांनी तत्काळ मदत करत चालकाचा जीव वाचवला.