

Maharashtra Education
Sakal
पुणे : केंद्र सरकारने विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविण्यासाठी ‘विद्या समीक्षा केंद्र’ (व्हीएसके) प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यावर हजेरी नोंदविण्याचे प्रमाण राज्यात अत्यंत कमी आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने पुन्हा एकदा शिक्षकांना प्रणालीतच हजेरी नोंदविण्याबाबत सक्त ताकीद दिली आहे. परिणामी, ‘नियमित हजेरी’ प्रणालीत नोंदविण्याचा अतिरिक्त ताण शिक्षकांवर पडणार असल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.