Pune : कर्करोगाशी लढण्याचं बळ देणारं विश्रांती हॉस्पिटल आजपर्यंत एक हजार पन्नास रूग्णांवर मोफत उपचार

कर्करोग असलेल्या रुग्णांना मोफत उपचार देण्याची सुविधा पुण्यातील विश्रांती हॉस्पिटलने २०१३ साली सुरू केली
pune
punesakal

पुणे : कर्करोग असलेल्या रुग्णांना मोफत उपचार देण्याची सुविधा पुण्यातील विश्रांती हॉस्पिटलने २०१३ साली सुरू केली.तेव्हापासून आजतागायत एक हजार पन्नास रूग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत.यासह १९९३ पासून या संस्थेशी संबंधित सेवक नागरिकांच्या घरी जाऊन तपासणी करतात.तसेच सामान्य आजारांवर दहा हजार पेक्षा जास्त रूग्णांना मोफत औषधोपचार केले आहेत.

कर्नल एनएस न्यायपती ( निवृत्त) यांच्या मातोश्रींना कर्करोग आजार होता, मात्र १९९० साली योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.या घटनेचे दुःख कर्नल न्यायपती यांना नेहमी होत असे.

या घटनेमुळे त्यांनी व त्यांच्या पत्नी डॉ.माधुरी यांनी निश्चय केला की, रूग्णांना मोफत उपचार देयाचे.१९९३ साली 'केअर इंडिया मेडीकल सोसायटीची स्थापना करूण सोसायटीच्या माध्यमातून 'सतसेवा योजना' सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून संस्थेतील सेवक नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची तपासणी करत, आजार असतील तर त्यांना मोफत औषधोपचार केले जातात.

२०१३ पासून पुण्यातील सदर बाजार परिसरात 'विश्रांती कॅन्सर केअर हॉस्पिटल' सुरू केले.या हॉस्पिटलच्या माध्यमातून महिलांच्या स्तनांचा, गर्भाशय, अंडाशय,तोंडाचा व पुरूषांच्या व तोंडाचा कर्करोग यावरती मोफत उपचार व समुपदेशन केले जाते. कर्करोगावर समुपदेशनाची जास्त गरज असल्याने कराड शहरात देखील ही सेवा दिली जात आहे.सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरातील रूग्ण कराड शहरात उपचार घेतात. भारतभरातून तसेच नेपाळवरून आलेल्या रूग्णांवर या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केलेत.या ठिकाणी अतिशय दुर्धर अशा कर्करोगाशी रूग्ण दोन हात करतात.कर्करोगाशी लढण्याचं बळ रूग्णांना या ठिकाणी मिळते. दानशूर व्यक्ती, संस्था यांनी केलेल्या मदतीतून हॉस्पिटल चालते.

रूग्णांना कर्करोगाचा त्रास कमी व्हावा, त्यांच्यावर मोफत उपचार करून समुपदेशन व्हावे. दूख कमी व्हावे, आयुष्य आनंदी बनवणं या उद्देशाने पत्नी डॉ.माधुरी यांच्या संकल्पनेतून हॉस्पिटल चालू केले आहे.या ठिकाणी कोमोथेरपीपासून कर्करोगाच्या सर्व ‌प्रक्रिया मोफत केल्या जातात गरजू रुग्णांनी सहभागी व्हावे.

संस्थापक विश्वस्त कर्नल एनएस न्यायपती ( निवृत्त)

दहा महिन्यांपासून मला हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत उपचार मिळत आहेत.हॉस्पिटलमध्ये मिळणारी सेवा चांगली आहे. उपचार घेत असल्याने माझा आजार कमी झाला आहे.

- रजिया मेमन सातारा महिला रूग्ण.

हे रूग्णालय म्हणजे रूग्णांसाठी मंदीर, माहेरघर आहे. रूग्णांना येथे स्वताचे घर असल्याची भावना आहे.कर्करोगाचे उपचार सगळीकडेच मिळतात तसेच येथे आहेत.पण या उपचारमागची भावणा सेवा ही आहे.

- डॉ. अनंत रानडे कर्करोग तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com