

Maharashtra Pune Voter List Under Major Revision 28 Lakh Names May Be Removed After Special Intensive Verification Drive
sakal
पुणे : मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेची मुदत सोमवारी संपुष्टात आली. त्यात जिल्ह्यात सुमारे २८ लाख ७९ हजार मतदार वगळले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याची मतदारसंख्या सुमारे ६२ लाखांवर आली आहे. पुढील टप्प्यात पत्त्यांमधील दुरुस्ती तसेच २००२ मधील मतदारयादीचे तपशील अशा सुमारे १५ लाख ५० हजार मतदारांची सुनावणी २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या काळात घेतली जाणार आहे.