Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Wagholi Dog Dispute Turns Violent Two Sisters Assaulted: पाळीव कुत्र्याच्या भुंकण्यावरून वाघोलीत संतापाचा स्फोट; दोन बहिणींवर दगड, लाथाबुक्क्या व लोखंडी सळईने मारहाण, दोघींना गंभीर दुखापत
Pune Crime News Two Sisters Assaulted In Wagholi After Argument Over Dog Barking Police Register Case

Pune Crime News Two Sisters Assaulted In Wagholi After Argument Over Dog Barking Police Register Case

esakal

Updated on

पुणे: कुत्र्याच्या अंगावर गाडी घातल्यानंतर तो भुंकल्याचा राग आल्याने दोघांनी महिलेसह तिच्या बहिणीला दगड, लाथाबुक्क्यांनी तसेच सळईने मारहाण केली. वाघोलीतील वाघमारे वस्तीमध्ये मंगळवारी (ता.१५) हा प्रकार घडला.

या मारहाणीत दोन्ही बहिणींना दुखापत झाली आहे.

या घटनेप्रकरणी जयश्री चव्हाण यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ताराचंद काळराम वाघमारे आणि हिरामण काळराम वाघमारे यांच्यावर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री चव्हाण यांच्या पाळीव कुत्र्याच्या अंगावर आरोपींपैकी एकाने गाडी घातली. त्यावेळी कुत्रे भुंकले. कुत्रे भुंकल्याचा राग आरोपीला आला आणि त्यातून वाद सुरू झाला. ताराचंद वाघमारे याने जयश्री चव्हाण यांना दगडाने तसेच हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात, छातीवर आणि पाठीवर दुखापत झाली. त्यानंतर त्यांची बहीण वैशाली यांनाही आरोपींनी मारहाण केली.

हिरामण वाघमारे याने हातातील लोखंडी सळईने वैशाली यांच्या डोक्यात आणि कमरेवर मारहाण केली. तसेच दोघींना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com