Pune Crime News
esakal
वाघोली : आईनेच ११ वर्षीय आपल्या मुलाचा घरात धारधार हत्याराने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना वाघोलीतील बायफ रोडवर घडली. तिने तिच्या १३ वर्षीय मुलीचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने आरडा ओरडा केला. शेजारी धावत आले. त्यामुळे मुलगी वाचली. मात्र ती जखमी झाली. कौटुंबिक तणावातून आईने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.