

Tractor Theft Case in Wagholi Area
Sakal
पुणे : वाघोली परिसरातील ट्रॅक्टर चोरी प्रकरणी पोलिसांच्या तपास पथकाने बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगाराला अटक केली. आरोपीकडून चोरीचा ट्रॅक्टर आणि एक दुचाकी असा सुमारे दोन लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंबादास विक्रम मिसाळ (वय ४३, रा. पिंपळनेर, ता. शिरूर, जि. बीड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.