

Shiv Sena Shinde Group Protests Against EVMs in Pune
Sakal
विश्रांतवाडी : पुण्यातील प्रभाग क्रमांक 1 मधील कळस या ठिकाणी शिवसेना शिंदे गट व रिपब्लिकन सेनेच्या वतीने ईव्हीएम मशीन फोडत या मशीन जाळल्या. कळस गावामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला कमी मत मिळाल्याने शिवसेना शिंदे आक्रमक झाली. लोकशाहीला काळिमा फासण्याची घटना या निवडणुकीत झाल्याचा निषेध करत आंदोलकांनी ईव्हीएम मशीनला हार घालून नंतर ती हातोड्यांनी फोडली, व पेट्रोल टाकून पेटवून दिल्या.