Pune Politics
Sakal
पुणे
Pune News : प्रभाग रचनेवर संताप; पुण्यात नागरिकांचा घोषणाबाजीचा धडाका
Pune Politics : पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर राजकीय पक्षपात व अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणावर घाला घालण्यात आल्याच्या आरोपांमुळे शेकडो नागरिकांनी हरकती नोंदवून प्रचंड संताप व्यक्त केला.
पुणे : माँ जिजाऊंचा कसबा कुठे गेला?, ठरावीक नेत्यांना खुला प्रभाग मिळावा यासाठी मुद्दाम अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण उठेल अशी प्रभाग रचना केली आहे. चुकीच्या पद्धतीने प्रभाग करून भाजपने स्वतःचा फायदा करून घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करा असे हरकती नोंदवत शिवाजी महाराज की जय... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देत शेकडो नागरिकांनी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती नोंदविल्या. नागरिकांचा या प्रभाग रचनेवर रोष बघता बालगंधर्व रंगमंदिर परिसरात व सभागृहात सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

