endlife
Sakal
आईने दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन मृत्यूला कवटाळलं आहे. पुण्यातील वारेज परिसरात ही घटना घडली. शारवी आदिनाथ देवडकर आणि आई छाया अशी मृत्यू झालेल्या आई आणि लेकीची नावे आहेत. मुलीच्या आजारपणाला त्रासल्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.