

Warje Open Gym in Disrepair
Sakal
वारजे : येथे महापालिकेने नागरिकांच्या आरोग्यवृद्धीसाठी उभारलेल्या खुल्या व्यायामशाळेची देखभाल-दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. तेथील साहित्य तुटलेल्या अवस्थेत अस्ताव्यस्त पडलेले आहे, तर काही उपकरणांना नागरिकांनीच लाकडांचा आधार देऊन ती उभी ठेवलेली दिसतात.