

Pune Civic Body’s Waste Project Tender Sparks Allegations of Multi-Crore Loss
sakal
पुणे: पुणे महापालिकेकडून ओल्या-सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उरुळी देवाची येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेचा घनकचरा प्रकल्प उभा केला जाणार आहे. पण निविदेच्या अटी-शर्ती निश्चित करताना हे दोन्ही प्रकल्प एकच ठेकेदार चालवेल, अशी अट टाकली आहे. त्यामुळे या निविदेत पुरेशी स्पर्धा न होता, पुणेकरांच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला जाणार आहे. त्यामुळे ही निविदा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.