

Gold Wedding Ring Found During Garbage Collection
sakal
पुणे : कचऱ्यात पडलेली लाखो रुपये असलेली बॅग परत करणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या कचरावेचकाची बातमी ताजी असतानाच, आता स्वच्छ संस्थेच्याच एका कचरावेचक महिला कर्मचाऱ्याने कचऱ्यात सापडलेली लग्नातील सोन्याची अंगठी परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. स्वच्छ संस्थेच्या शालन वायला या सोमवारी (ता.२२) रोजी कसबा विश्रामबागवाडा परिसरात घरोघरी कचरा संकलनाचे काम करत होत्या.