Pune News: पुणे-पिंपरीत पाणीकपात, तरी पवना नदीतून पाणीचोरी! विहिरीत साठवून टँकरने विक्री; चार दिवसांचा अल्टिमेटम

Four Day Deadline to Stop Illegal Water Extraction in Ravet: पुणे-पिंपरीतील पाणीटंचाईत पाणीचोरीचा धंदा! बेकायदा उपसे बंद न केल्यास गुन्हे दाखल
Illegal Water Extraction From Pavana River in Pune Four Day Deadline Issued to Stop Tanker Water Supply

Illegal Water Extraction From Pavana River in Pune Four Day Deadline Issued to Stop Tanker Water Supply

esakal

Updated on: 

-नरेंद्र साठे

पुणे : राज्यात दुष्काळी परिस्थिती आणि पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पाणीकपात लागू असतानाही पवना नदीपात्रातून सर्रास पाणीचोरी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नदीतून पाणी उपसून विहिरीत साठवायचे आणि टँकरद्वारे त्याची विक्री करायची, असा प्रकार रावेत परिसरात आढळला. जलसंपदा विभागाने कारवाई करून पाणीउपशाची यंत्रणा हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नदीपात्रातील सर्व बेकायदा उपसे चार दिवसांत बंद करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि टँकरचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...