
पुणे शहरातील उपनगरांमध्ये ५ मेपासून पाणी कपात करण्यात येणार आहे. शहरात पाण्याची मागणी वाढली असून, उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने पुणे महानगरपालिका (PMC)ने हा कठोर निर्णय घेतला आहे.
या पाणी कपात मोहिमेची सुरुवात दक्षिण पुण्यातील कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसरातून होणार आहे. या भागांना वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होतो. मात्र, त्या केंद्रातून उपलब्ध पाणी अपुरे पडत असल्यामुळे महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.