

Pune Water Supply News PMC May Delay Alternate Day Water Cuts After Diwali Following Approval of 13 TMC Water Quota
sakal
पुणे : शहरात दिवाळीनंतर लगेच पाणीकपातीत वाढ करून दिवसाआड पुरवठा केला जाण्याची शक्यता होती. मात्र, आता कपात लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शहरासाठी पाटबंधारे विभागाने १३ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. त्यावर महापालिकेबरोबर चर्चा केली जावी, असे पत्र पाटबंधारे विभागाला पाठविण्यात येणार आहे. चर्चेनंतरच पाणीकपात वाढविण्यासंदर्भात निर्णय होईल.