Water Leakage Issue : अजित दादांनी ठोकले, चंद्रकांत दादांनी सावरले

‘मी पालकमंत्री असताना पाणी गळतीवर जी उत्तरे दिली जात होती, तिच उत्तरे आता चंद्रकांत पाटील यांना देऊन महापालिकेचे अधिकारी वेळ मारून नेत आहेत.
AJit Pawar and Chandrakant Patil
AJit Pawar and Chandrakant Patilsakal
Summary

‘मी पालकमंत्री असताना पाणी गळतीवर जी उत्तरे दिली जात होती, तिच उत्तरे आता चंद्रकांत पाटील यांना देऊन महापालिकेचे अधिकारी वेळ मारून नेत आहेत.

पुणे - ‘मी पालकमंत्री असताना पाणी गळतीवर जी उत्तरे दिली जात होती, तिच उत्तरे आता चंद्रकांत पाटील यांना देऊन महापालिकेचे अधिकारी वेळ मारून नेत आहेत. कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत आणि पाणी गळती रोखली नाही तर आयुक्तांनी राजीनामा द्यावा,’ अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांची बाजू सावरून घेत ‘तुमची एवढ्या वर्ष सत्ता होती, त्यावेळी गळती का रोखली नाही? असा प्रतिप्रश्‍न पवार यांना केला. अधिकाऱ्यांचा राजीनाम्याने हा प्रश्‍न संपणार नाही. पुढील दोन वर्षात समान पाणी पुरवठा योजनेचे काम दोन वर्षात पूर्ण होऊन पाणी गळतीचा विषयच संपेल.’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.

पुण्याच्या पाणी प्रश्‍नावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यांनी शहरातील व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ४० टक्के पाणी गळतीवर जोरदार चर्चा झाली. ग्रामीण भागातील आमदारांनी महापालिका गळती कमी करत नाही, दुसरीकडे पाणी वापर वाढवत आहेत, त्यामुळे शेतीला पाणी कमी मिळत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले पण त्यावर समाधान न झाल्याने तेच तेच उत्तर दिले जात असल्याची टीका केली.

न्यायालयात वस्तुस्थिती सांगावीच लागणार - पवार

पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘महापालिका आयुक्तांनी ४० टक्के गळती होत असल्याचे सांगितले. पण ही गळती जलवाहिनी, कालव्यातून होत असल्याने ते पुणेकरांना मिळत नसल्याने जास्त पाणी वापराचा आरोप चुकीचा आहे. यापूर्वी महापालिकेचे आयुक्त सौरभ राव होते, त्यानंतर शेखर गायकवाड आणि आता विक्रम कुमार आहेत, या तिघांचीही पाणी गळतीची उत्तरे सारखे आहेत. त्यात काहीच बदल होत नाही. जर सप्टेंबर २०२३ पर्यंत पाणी गळती कमी झाली नाही तर आयुक्त ज्या ठिकाणी काम करत असतील त्या पदाचा पदाचा राजीनामा द्यावा. न्यायालयाने पाणी पुरवठ्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या या उत्तरांची गंभीर दखल घेतली जाईल, त्यांना न्यायालयात वस्तुस्थिती सांगावी लागणार आहे. त्यावेळी दूध का दूध पानी का पानी होईल,’ अशी टीकाही पवार यांनी केली.

राजकारण करून विषय संपणार नाही - पाटील

अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने सादरीकरण केले. पण त्यामुळे समाधान झाले नाही म्हणून टीका करणे योग्य नाही. तुमची सत्ता असूनही २० वर्षे या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष दिले नाही. आता आम्ही उपाययोजना करत आहोत. पाणी गळती रोखण्यासाठी समान पाणी पुरवठा योजनेतून ८२ टाक्या बांधल्या जाणार आहेत, जून २०२४ पर्यंत जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण होईल. त्यामुळे सध्याची ४० टक्के गळती रोखली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी उत्तम पद्धतीने सादरीकरण केले, यात अधिकाऱ्यांची काहीही चूक नाही. जायका प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे शुद्ध केलेले पाणी टॅंकरद्वारे उचलून बांधकाम, उद्यानांसाठी, गाड्या धुण्यासाठी दिले जाईल. त्यातूनही पिण्याच्या पाण्याचा वापर कमी होईल.

शासनाच्या मदतीतून टाक्यांची दुरुस्ती

महापालिकेची यंत्रणा सुधारली तरी सोसायट्यांच्या टाक्यांमधून पाणी गळती होत आहे, यामुळे पाण्याचे मीटर रीडिंग जास्त येत आहे हे चंद्रकांत पाटील आणि अजित पवार या दोघांनीही अधोरेखित केले. पाटील म्हणाले, सोसायट्यांच्या टाकातील पाणी गळती रोखण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला हे. त्यात दुरुस्तीचा २५ टक्के खर्च सोसायटी, २५ टक्के आमदार निधी, २५ नगरसेवक आणि २५ जिल्हा नियोजन समितीतून दिला करता येईल. यास आमदार निधी देणार नाहीत असे म्हणत अजित पवार यांनी विरोध केला आहे पण हा प्रश्‍न त्यातून सुटू शकेल.'

या कामासाठी एका संस्थेची नेमणूक केली जाईल. त्यांच्या माध्यमातून ही कामे केली जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com