

Khariwadla-Parvati Pipeline Repair
Sakal
पुणे : खडकवासला धरणातून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्यासाठी टाकण्यात आलेल्या तीन हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. हे काम कमीत कमी तीन महिने चालणार आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पर्वती जलकेंद्रापर्यंत आता कालव्यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. पुढील काही दिवसांत हे काम सुरू होणार असल्याने पाणीपुरवठा काही प्रमाणात विस्कळित होण्याची शक्यता आहे.