Pune: पाणी पुरवठ्याच्या कामासाठी खोदलेले खड्डे ठरताहेत त्रासदायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डे ठरताहेत त्रासदायक

पुणे : पाणी पुरवठ्याच्या कामासाठी खोदलेले खड्डे ठरताहेत त्रासदायक

sakal_logo
By
दत्ता लवांडे

कोथरुड : मीनाताई ठाकरे नगर, म्हाडा कॉलनी येथे दिवाळी पुर्वी एल अँड टी कंपनीने नवीन पाण्याची लाईन टाकण्यासाठी खोदकाम केले होते. सध्या हे काम अर्धवट अवस्थेत असून खड्डे तसेच राहिल्याने रहिवाशांना येण्याजाण्यासाठी व वाहन चालविताना त्रास होतो. धुळ सारखी उडत असल्याने कपडे व गाडी धुण्याचा खर्च वाढला आहे. महिलांना घरातील धुळ सारखी झाडण्याचे काम करावे लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

म्हाडा कॉलनी येथे राहणारे चारुदत्त घाटगे म्हणाले की, आमची आख्खी दिवाळी धुराळ्यात गेली. दिवाळी संपली तरी धुराळा चालूच आहे. काम झाले असेल तर रस्ता पुर्ववत करुन द्यावा म्हणजे आमचा त्रास कमी होईल.

हेही वाचा: रात्रीच्या ध्वनी प्रदूषणात नागपूरचा आघाडीच्या दहा शहरात समावेश

शंतनु खिलारे म्हणाले की, सहवास सोसायटी परिसरात सुध्दा पाणी पुरवठा योजनेसाठी खोदकाम करुन ठेवले आहे. काम झाल्यानंतर रस्ता पुर्ववत करण्यात ठेकेदार दिरंगाई करत आहेत. त्यामुळे आमच्या गाड्यांवर सारखी धुळ जमा होते. आमच्या इमारती लगत असलेले गँरेज व्यावसायिक तर पुरते वैतागून गेले आहेत. वॉशिंग करुन आणलेली गाडी आहे असा ग्राहकाचा विश्वासच बसत नसल्याने त्यांना ग्राहकांची बोलणी खावी लागत आहेत.

वारजे कर्वेरोड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम म्हणाले की, पुण्याला २४ तास समान पाणी पुरवठा योजने संदर्भात हे खोदकाम झाले असून संबंधित विभागाला रस्ता दुरुस्ती करण्या संदर्भात कळवतो.

loading image
go to top