Nagpur: रात्रीच्या ध्वनी प्रदूषणात नागपूरचा आघाडीच्या दहा शहरात समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

रात्रीच्या ध्वनी प्रदूषणात नागपूरचा आघाडीच्या दहा शहरात समावेश

नागपूर : राज्यातील सर्वच शहरात दिवसा आणि रात्रीच्या ध्वनी प्रदूषणात धोकादायक वाढ झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रातील २७ महापालिका शहरात १०२ ठिकाणी ध्वनी प्रदूषणाची सतत २४ तास निरीक्षण केले. या अहवालानुसार रात्रीच्या ध्वनिप्रदूषणात नागपूरचा आघाडीच्या राज्यातील दहा शहरांमध्ये समावेश असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

राज्यातील सर्वच औद्योगिक, व्यावसाईक, रहिवासी आणि शांतता क्षेत्रातील सर्वच प्रभागात ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे उघडकीस आले आहे. ध्वनी प्रदूषण हे अदृश्य असले तरी ते जीवघेणे आहे. निरीक्षण करताना दिवसा आणि रात्रीचा तसेच कार्यालयीन आणि सुट्टीच्या दिवसांचा समावेश केला होता. प्रदूषण नियंत्रण गेल्या १० वर्षापासून मंडळ ध्वनी प्रदूषणाच्या नोंदी घेत आहेत. बहुतेक शहरात दिवसा आणि रात्री ध्वनी प्रदूषण सुरक्षित मानकापेक्षा अधिक आढळले आहे. अमरावती आणि चंद्रपूरचे दिवसाचे ध्वनिप्रदूषण नागपूरपेक्षा अधिक आहे.

हेही वाचा: VIDEO: "स्वातंत्र्य 'भीक' असेल तर सावरकरांना 'भिक्षावीर' म्हणावं का?"

२७ शहरातील नोंदी

शहर - दिवस आणि रात्र डेसिबलमध्ये

नागपूर- ७३-६८

अमरावती - ७४-६८

चंद्रपूर - ७४-६८

अकोला - ७३-६४

मुंबई - ७७.९ - ६९ डेसिबल

नवी मुंबई - ७०.८ – ६६.३

ठाणे ७६.९.-७४.६

पुणे - ७७ -६२

नाशिक -७५.२- ६८.२

औरंगाबाद ४७.३-४६.७

कल्याण - ७४-६३.९

जळगाव - ७३-५८

कोल्हापूर - ८०.७-७१

सांगली - ७४-५४.९

मीरा भाईंदर - ७४.८-६३

वसई-विरार ७५.२-६५.९

उल्हास नगर - ७४-६०

भिवंडी -७४-७२

नांदेड -६०-४८,

अहमदनगर - ७०-६३.८

धुळे - ७०.९- ६६.2

मालेगाव - ७१.४-६८

पिंपरी चिंचवड - ७५-६२

परभणी - ५९.४-४७.५

लातूर - ६०-४४

सोलापूर - ७८.४-७१.७

पनवेल - ७५-६२.४

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

दिवसाच्या ध्वनी प्रदूषणाचे आघाडीचे दहा शहरे

१) कोल्हापूर २) मुंबई ३) मीरा भाईंदर ४) सोलापूर ५) पुणे ६) वसई विरार ७) नाशिक ८) कल्याण ९) अमरावती १०) सांगली

रात्रीच्या धनी प्रदूषणात आघाडीवरील १० शहरे

१) ठाणे २) भिवंडी ३) सोलापूर ४) मुंबई ५) नाशिक ६) नागपूर ७) चंद्रपूर ८) मालेगाव ९) अमरावती १० ) नवी मुंबई

आजच्या वाढत्या औद्योगीकरण, विकासाच्या विविध योजना, वाहतूक ,बांधकाम, आधुनिक घरगुती उपकरणे, वाहने आणि यंत्रे हे ध्वनी प्रदूषणाचे महत्त्वाचे स्रोत आहेत. विमाने ,वाहनाचे कर्कश हॉर्न, लाऊड स्पीकर, बँड, डीजे, फटाके, रेल्वे, वाहने.घरातील टीव्ही, होम थिएटर्स, स्वयंपाक घरातील यंत्रे किंवा विविध कामांसाठी वापरात येणारी यंत्रे ही ध्वनी प्रदूषणास कारणीभूत आहेत.

सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी.

loading image
go to top