Pune Water Supply: पुणेकरांनो, पाण्याचे गणित बदलले! पाटबंधारे विभागाने केली पाच टीएमसीची कपात; मंजूर १६.१९१ टीएमसीपैकी प्रत्यक्षात किती पाणी मिळणार?

Pune Water Quota Cut by Nearly Five TMC for 2026 to 2027: पुण्याच्या पाण्यात कपात का झाली? विहिरी-बोअरवेलच्या हिशेबावरून नवा वाद
Pune Water Supply Under Pressure as Irrigation Department Cuts Nearly Five TMC From the City Water Quota for 2026 to 2027

Pune Water Supply Under Pressure as Irrigation Department Cuts Nearly Five TMC From the City Water Quota for 2026 to 2027

sakal

Updated on: 

पुणे : शहरासाठी पाटबंधारे विभागाने आगामी वर्षासाठी १६.१९१ हजार दशलक्ष घनफूट (टीएमसी) पाणी कोटा मंजूर केला आहे. पण त्यातून विहिरी, बोअरवेल्सच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचा नवीन शोध लावत थेट ४.८५७ टीएमसी पाणी कपात केली आहे. त्यामुळे पुणेकरांना फक्त ११.३३४ टीएमसी पाणी धरणातून उपलब्ध होणार आहे. ऐन दुष्काळात पुणेकरांच्या तोंडचे पाच टीएमसी पाणी पळविण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने महापालिकेचे धाबे दणाणले आहेत. यावर महापालिकेने हरकत घेत पाटबंधारे विभागाला हा पाणी कोटा मान्य नसल्याचे कळविले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com