पुणे : पर्वती येथून एस.एन.डी.टी.कडे जाणारी मुख्य जलवाहिनी (पाईपलाइन) फुटल्याने रविवारी (ता. २० जुलै) पुणे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत (Pune Water Supply Disruption) झाला आहे. विशेषतः सुट्टीच्या दिवशी ही समस्या निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. उपनगरांतील बहुतांश परिसरांना याचा मोठा फटका बसला आहे.